शब्द.

शब्दांसारख शस्त्र नाही, त्यांचा वापर जपुनच करावा.

मैत्री.

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते.

वय.

तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे.

सेनापती.

शेळ्यांच्या सैन्याचा सेनापती सिंह असला तर तो कोणत्याही सिंहांच्या सैन्याला ज्याचा सेनापती शेळी असेल त्याला सहजच हरवू शकते.

गैरसमज.

गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो.
तिसर्‍या अवस्थेला पोचल्यावर तो आपलं स्वरुप प्रकट करतो. -व. पू. काळे, वपूर्झा.

भय.

भया सारखे मोठे पाप नाही. -स्वामी विवेकानंद.

आनंद.

आनंद माणसाची मानसिक अवस्था आहे.

बचत.

खर्च झाल्यानंतर वाचलेल्या पैशातुन बचत करण्यापेक्षा, बचत झाल्यावर वाचलेले पैसे खर्च करायला शिकायला हवे.

वय !

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही. -ली ब्राऊन.

राष्ट्र.

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे, आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. -नेताजी सुभाषचंद्र बोस.

मागणी.

देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा.
कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल.

मार्ग.

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुथे जातो. -अनाटोल फ्रांस.

जीवन.

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.

जीवन.

जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते.

आळस !

काहिच न करण्या सारखे कष्टाचे दुसरे काम नाही, त्याला प्रखर बुध्धिमत्तेची गरज असते.

देव.

देव कुठे शोधणार ? जर तो तुम्हाला आपल्या हृदयात व जिवंत प्राण्यात दिसत नसेल तर तो कुठेही भेटणार नाही. -स्वामी विवेकानंद.

सत्य.

सत्य हजार प्रकारे सांगता येते, तरीही ते सत्यच असते. -स्वामी विवेकानंद.

मेहनत.

कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.

लोकांचे प्रकार.

जगात तीन प्रकारचे लोक असतात.

प्रकार १. हे लोकं, काही करतात, घडवतात.

२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.

३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.

चुक.

चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.

झोप.

दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते. वाहन चालवतांना झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.

मूर्ख.

मला मूर्ख माणसे फार आवडतात, त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा असतो.

विचार.

प्रत्येक काळातील विचार हे त्या त्या काळातील राज्यकर्त्यांचेच असतात. -मार्क्स एंगल्स.