निर्णय

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

सामर्थ्य

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

अपयशाचं महत्व

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.

दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.

घर

घर असतं दोघांचं. दोघांनी सावरायचं.

एकानं विस्कटले तर दुसऱ्याने आवरायचं.