Showing posts with label सुविचार. Show all posts
Showing posts with label सुविचार. Show all posts

वय.

तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे.

सेनापती.

शेळ्यांच्या सैन्याचा सेनापती सिंह असला तर तो कोणत्याही सिंहांच्या सैन्याला ज्याचा सेनापती शेळी असेल त्याला सहजच हरवू शकते.

सोबत.

तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही, तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.

सुविचार २

१. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाअसतो.
२. उद्याच काम आज करा आणि आजचं काम आत्ता करा.
३. रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका, शहाणपणाने काम करा.
४. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
५. श्रीमंती पैशावरून नाही तर किती माणसे जोडली यावरून कळते.
६. एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

सुविचार १

१. स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.
२. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
३. आपण जे पेरतो तेच उगवतं.
४. चुकतो तो माणूस आणि चुक सुधारतो तो देवमाणूस.
५. अंथरूण बघून पाय पसरावेत.
६. सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
७. वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस. !!
८. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
९. चांगले तेवढे घ्या , वाईट फेकून द्या.
१०. पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.