सुविचार १

१. स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.
२. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
३. आपण जे पेरतो तेच उगवतं.
४. चुकतो तो माणूस आणि चुक सुधारतो तो देवमाणूस.
५. अंथरूण बघून पाय पसरावेत.
६. सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
७. वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस. !!
८. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
९. चांगले तेवढे घ्या , वाईट फेकून द्या.
१०. पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.