गुन्हा : हृदय.

कोणत्याही गुन्ह्याची सुरुवात हृदयापासुन होते. -विलीयम शेक्सपिअर.

प्रगति !

तिसर्‍या महायुद्धात कुठली शस्त्रे वापरली जातील, याची मला कल्पना नाही. मात्र, चौथ्या महायुद्धात काठ्या आणि दगड हीच शस्त्रे असतील. - अल्बर्ट आइनस्टाइन.

माणुसकी.

शहाण्या माणसाच्या डोक्यात पैसा असतो तर हॄदयात माणुसकी.

पैसा.

जो पैशाला सर्व काही समजतो तो सर्व काही पैशा साठीच करित असतो.

राक्षस.

पैसा हा देवा सारखा समजा, देव तुमच रुपांतर राक्षसात करिल.

आकांक्षा.

स्वत:ला सिमीत ठेवू नका. बरेच लोक विचार करतात तितकच मिळवायचा विचार करतात. तस न करता तुमच मन जितक धावतं तितक तुम्ही मिळवू शकता व ते मिळवायचा प्रयत्न करित रहा व स्वत:वर विश्वास ठेवा.

हास्य .

हसणे, मुले त्यांच्या पालकांकडुनच शिकत असतात.

त्याग.

आपल्या पालकांनी आपल्या साठी केलेला त्याग, आपण पालक झाल्यावरच कळतो.

देणगी.

देवाने मला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजेच माझे वडिल आहेत.

भीती.

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच.

चुक.

कामात चुक झाली तर घाबरु नका. ती दुरुस्त करण्यास तत्पर रहा.

शांतता.

या जगात शांततेपेक्षा मोठा आवाज नाही. ज्याला तुमची शांतता कळत नाही त्याला तुमचे शब्दही कळणारच नाहीत.

सोबत.

तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही, तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.

हसणे !

हसल्या शिवाय एक दिवस घालवणे म्हणजे आयुष्यातला एक दिवस वाया घालवण्यासारखे आहे.

सौंदर्य.

शारिरीक सौंदर्य डोळ्यांसाठी सुखद असु शकते पण चांगले व्यक्तिमत्व मनाचा ठाव घेते.

दिवाळी शुभेच्छा.

दिवाळीच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

यश.

तुमचे यश महत्वाचे निर्णय लौकर घेण्यात नसते, तर महत्वाचे निर्णय लौकर अमलात आणण्यात असते.

कारणे.

काम करायची ईच्छा नसल्यास कारणे हजार असतात.

शंभरी !

एखाद्या व्यक्तिने आपल्या आयुष्याची शंभरी गाठली, यात त्याव्यक्तिच्या कर्तुत्वा पेक्षा, इतरांनी त्याला जगु दिले हे महत्वाचे आहे.

प्रेम !

तुमचा कुत्रा या जगात असा एकच प्राणी आहे जो तुमच्यावर तुमच्यापेक्षाही जास्त प्रेम करतो. -जोश बिलिंग्स.

मित्र.

कुत्र्याला बरेच मित्र असतात कारण तो माणसांसारखा जिभेचा वापर न करता शेपटीचा वापर करतो.

पैसा.

शहाण्या माणसाने पैसा हॄदयात नाही तर डोक्यात ठेवावा. -जोनाथन स्विफ्ट.

प्रश्न.

शिक्षणात महत्वाचे म्हणजे प्रश्न विचारणे थांबवायला नको. -अल्बर्ट आईन्स्टाईन.

अंधत्व

जे पाहू इच्छीत नाहीत त्यांच्यासारखे आंधळे दुसरे नसतात. -स्वीफ्ट.

मूर्ख माणसे.

या जगात यशस्वी व्हायचे असेल तर मूर्खपणाचे सोंग घेऊन शहाण्यासारखे वागले पाहिजे. -मॉंटेस्कू.

निर्णय.

बरोबर किंवा चुकीचे उत्तर शोधणे म्हणजे निर्णय घेणे नव्हे, तर कोणती कॄती जास्त परिणामकारक ठरेल किंवा कमी परिणामकारक ठरेल यातून निवड करणे म्हणजे निर्णय घेणे असते. -फिलीप मार्वीन.

आनंद.

आनंदाचा प्रत्येक क्षण हा मोलाचा असतो, आणि तो कितीही क्षुल्लक असला तरी त्याची किंमत कमी होत नाही. -आर. ब्राऊनिंग.

विचार

तुमच्या मनाच्या कोठारात सुखद विचार साठवून ठेवा. कारण सुखद विचारामुळेच सुखद जीवने घडतात. -सिल्किन्स.

काळजी.

काळजीमुळे मांजर मरत असेल तर मरु दे, आपण मात्र हसूया आणि लठ्ठ होऊया.
ज्यांचा काहीही संबंध नाही असे लोकच दुसर्‍याच्या भानगडीत उत्तम तर्‍हेने नाक खुपसू शकतात. -व्हिक्टर ह्युगो.

कल्पना.

एखादी चांगली कल्पना ठार मारण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ती मीटिंगमध्ये मांडणे !

धोरण.

धोरण आणि ध्यास असेल तरच धेय गाठता येते.

वळण.

वाहन केंव्हाही वळवता येते, पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये.

निर्णयाचेही असेच असते

निर्णय केंव्हाही घेता येतो, पण वेळ आल्याशिवाय तो घेऊ नये.

मुर्ख.

मुर्खांसोबत वाद घालु नका, लोकांना फरक कळणार नाही.

अंधार.

अज्ञाना सारखा भयानक अंधार नाही.

छाप.

प्रथमदर्शनी छाप पाडण्याची दुसरी संधी कुणालाच मिळत नाही.

यश.

यश मिळवण्यासाठी अपयश टाळण्यासाठीचा विचार अधिक आणि आधी करा.

श्रद्धा.

तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल. पण तुमची स्वत:वर जर श्रद्धा नसेल, तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी स्वत:वर श्रद्धा ठेवा आणि शक्तिशाली व्हा. - स्वामी विवेकानंद.

विश्वास.

तुमचा स्वत:वर विश्वास असेल, तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. -गटे.
माणूसकीपेक्षा मोठा धर्म नाही. - अज्ञात.

संगत.

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले. -जॉर्ज वॉशिंग्टन.

म्हातारपण.

विनासायास तुम्हाला लाभणारी एकमेव गोष्ट म्हणजे म्हातारपण.

पाऊल.

तुम्ही बरोबर आहात याची खात्री पटल्यानंतरच पाऊल पुढे टाका. -डेव्हिड क्रॉकिट.

भले.

आपण जर दुसर्‍यांचे चांगले करित गेलो तर हॄदयाने शुद्ध होतो, आणि देवाचा आपल्यात वास रहतो. -स्वामी विवेकानंद.

व्यायामशाळा.

जग ही एक मोठ्ठी व्यायामशाळा आहे जेथे आपण स्वत:ला मजबूत करायला येतो. -स्वामी विवेकानंद.

विश्वास.

स्वत:वर विश्वास असल्याशिवाय तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. - स्वामी विवेकानंद.

लग्न.

मला लग्न हे एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची घटना वाटते, ते चांगल्या किंवा वाईट आयुष्याचा पाया असते. - जॉर्ज वॉशिंग्टन.

मेहनत.

बर्‍याच लोकांना मेहनत आवडते, विशेषत: ज्यासाठी त्यांना पैसे मोजवे लागतात. - फ्रॅंकलीन पी. जोनस.

साहेब.

तुमचा साहेब तुम्हाला मुर्ख वाटतो ना ?


लक्षात ठेवा तो शहाणा असता तर तुम्हाला नोकरी मिळाली असती कां ? - जॉन गोट्टी.