आयुष्य

आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. - अज्ञात.

स्वर्ग.

स्वर्ग अशी सुंदर जागा आहे जेथे सुंदर लोक सुंदर तर्‍हेने वेळ घालवतात. - डेव्हिड ब्रान बर्ग.

शिक्षण

शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. -जे. कॄष्णमूर्ती.

स्वप्न.

स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते. - ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती.

शिक्षण

चांगले शिक्षण फक्त माणसाला जगात यशस्वी होणे शिकवत नाही तर अपयश पचवण्याची शक्ती देते. -बर्नार्ड ईडींग्स बेल.

मदत.

कुणाची निंदा करु नका. कोणाला मदत करु शकत असाल तर मदत करा अन्यथा हात जोडून त्यांच्यासाठी प्रार्थना करा व त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. - स्वामी विवेकानंद.

हिंमत

अपयशाला फार महत्व नाही तर स्वत:वर विनोद करण्यासाठी हिंमत लागते व तशी विनोदबुद्धि लागते. -चार्ली चॅप्लीन.

बळ.

कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते. - लाओ त्झु.

श्रीमंती

श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे. - जॉन विकर.

जीवन.

" माझ्या वडिलांनी एकदा सांगीतलं, " सार जग डावीकडे जात असेल अन तुला उजवीकडे जावस वाटत असेल तर तु उजवीकडे जा. दुसर्‍याच अनुकरण करायची आवश्यकता नाही आणि फार विचार करायची गरज नाही. फक्त पुढे जात रहा हे फार सोपं आहे" - यान्नी, गायक.