मन.

मन एखाद्या चोरासारखं असतं. ते कायम कशाच्यातरी प्रतिक्षेत असतं. -अज्ञात.

आयुष्य

आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. - अज्ञात.

स्वर्ग.

स्वर्ग अशी सुंदर जागा आहे जेथे सुंदर लोक सुंदर तर्‍हेने वेळ घालवतात. - डेव्हिड ब्रान बर्ग.

शिक्षण

शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. -जे. कॄष्णमूर्ती.