घर

घर असतं दोघांचं. दोघांनी सावरायचं.

एकानं विस्कटले तर दुसऱ्याने आवरायचं.

दुसरी बाजू

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.

दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.

सामर्थ्य

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात

ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

सेनापती.

शुर सैनिकांच्या सेनापती घाबरट असेल तर त्याना हरवणे कुणालाही सहज शक्य आहे.