लोकांचे प्रकार.

जगात तीन प्रकारचे लोक असतात.

प्रकार १. हे लोकं, काही करतात, घडवतात.

२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.

३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.

चुक.

चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.

झोप.

दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते. वाहन चालवतांना झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.

मूर्ख.

मला मूर्ख माणसे फार आवडतात, त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा असतो.

विचार.

प्रत्येक काळातील विचार हे त्या त्या काळातील राज्यकर्त्यांचेच असतात. -मार्क्स एंगल्स.

गुन्हा : हृदय.

कोणत्याही गुन्ह्याची सुरुवात हृदयापासुन होते. -विलीयम शेक्सपिअर.

प्रगति !

तिसर्‍या महायुद्धात कुठली शस्त्रे वापरली जातील, याची मला कल्पना नाही. मात्र, चौथ्या महायुद्धात काठ्या आणि दगड हीच शस्त्रे असतील. - अल्बर्ट आइनस्टाइन.

माणुसकी.

शहाण्या माणसाच्या डोक्यात पैसा असतो तर हॄदयात माणुसकी.

पैसा.

जो पैशाला सर्व काही समजतो तो सर्व काही पैशा साठीच करित असतो.

राक्षस.

पैसा हा देवा सारखा समजा, देव तुमच रुपांतर राक्षसात करिल.

आकांक्षा.

स्वत:ला सिमीत ठेवू नका. बरेच लोक विचार करतात तितकच मिळवायचा विचार करतात. तस न करता तुमच मन जितक धावतं तितक तुम्ही मिळवू शकता व ते मिळवायचा प्रयत्न करित रहा व स्वत:वर विश्वास ठेवा.

हास्य .

हसणे, मुले त्यांच्या पालकांकडुनच शिकत असतात.

त्याग.

आपल्या पालकांनी आपल्या साठी केलेला त्याग, आपण पालक झाल्यावरच कळतो.

देणगी.

देवाने मला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजेच माझे वडिल आहेत.

भीती.

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच.