Showing posts with label Best Marathi Quotes. Show all posts
Showing posts with label Best Marathi Quotes. Show all posts

भय.

भया सारखे मोठे पाप नाही. -स्वामी विवेकानंद.

आनंद.

आनंद माणसाची मानसिक अवस्था आहे.

बचत.

खर्च झाल्यानंतर वाचलेल्या पैशातुन बचत करण्यापेक्षा, बचत झाल्यावर वाचलेले पैसे खर्च करायला शिकायला हवे.

वय !

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही. -ली ब्राऊन.

राष्ट्र.

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे, आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. -नेताजी सुभाषचंद्र बोस.

मागणी.

देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा.
कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल.

मार्ग.

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुथे जातो. -अनाटोल फ्रांस.

जीवन.

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.

जीवन.

जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते.

आळस !

काहिच न करण्या सारखे कष्टाचे दुसरे काम नाही, त्याला प्रखर बुध्धिमत्तेची गरज असते.

देव.

देव कुठे शोधणार ? जर तो तुम्हाला आपल्या हृदयात व जिवंत प्राण्यात दिसत नसेल तर तो कुठेही भेटणार नाही. -स्वामी विवेकानंद.

सत्य.

सत्य हजार प्रकारे सांगता येते, तरीही ते सत्यच असते. -स्वामी विवेकानंद.

मेहनत.

कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.

लोकांचे प्रकार.

जगात तीन प्रकारचे लोक असतात.

प्रकार १. हे लोकं, काही करतात, घडवतात.

२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.

३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.