सुविचार २

१. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाअसतो.
२. उद्याच काम आज करा आणि आजचं काम आत्ता करा.
३. रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका, शहाणपणाने काम करा.
४. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
५. श्रीमंती पैशावरून नाही तर किती माणसे जोडली यावरून कळते.
६. एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

सुविचार १

१. स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.
२. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
३. आपण जे पेरतो तेच उगवतं.
४. चुकतो तो माणूस आणि चुक सुधारतो तो देवमाणूस.
५. अंथरूण बघून पाय पसरावेत.
६. सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
७. वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस. !!
८. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
९. चांगले तेवढे घ्या , वाईट फेकून द्या.
१०. पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

नमस्कार

विद्यार्थ्यांना उपयुक्त असे वाक्प्रचार म्हणी देण्याचा हा एक प्रयत्न आहे. वाचकांना काही सुचना असल्यास Comment मधे द्यावीत. लवकरच हे पान आपल्यासाठी येत आहे.