विवाह / लग्न.

विवाह एक अशी ईमारत आहे ज्याची बांधणी रोज करावी लागते. - आंद्रे मॉरोइस.

मन.

मन एखाद्या चोरासारखं असतं. ते कायम कशाच्यातरी प्रतिक्षेत असतं. -अज्ञात.

आयुष्य

आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. - अज्ञात.

स्वर्ग.

स्वर्ग अशी सुंदर जागा आहे जेथे सुंदर लोक सुंदर तर्‍हेने वेळ घालवतात. - डेव्हिड ब्रान बर्ग.

शिक्षण

शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. -जे. कॄष्णमूर्ती.

स्वप्न.

स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते. - ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती.

शिक्षण

चांगले शिक्षण फक्त माणसाला जगात यशस्वी होणे शिकवत नाही तर अपयश पचवण्याची शक्ती देते. -बर्नार्ड ईडींग्स बेल.

मदत.

कुणाची निंदा करु नका. कोणाला मदत करु शकत असाल तर मदत करा अन्यथा हात जोडून त्यांच्यासाठी प्रार्थना करा व त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. - स्वामी विवेकानंद.

हिंमत

अपयशाला फार महत्व नाही तर स्वत:वर विनोद करण्यासाठी हिंमत लागते व तशी विनोदबुद्धि लागते. -चार्ली चॅप्लीन.

बळ.

कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते. - लाओ त्झु.

श्रीमंती

श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे. - जॉन विकर.

जीवन.

" माझ्या वडिलांनी एकदा सांगीतलं, " सार जग डावीकडे जात असेल अन तुला उजवीकडे जावस वाटत असेल तर तु उजवीकडे जा. दुसर्‍याच अनुकरण करायची आवश्यकता नाही आणि फार विचार करायची गरज नाही. फक्त पुढे जात रहा हे फार सोपं आहे" - यान्नी, गायक.

अफवा.

अफवा आपल्याला आवडतात असे कोणीही कबूल करत नाही. मात्र प्रत्येकजण त्यातल्या गमतीचा आनंद घ्यायला तयार असतो. -जोसेफ कॉनरा.

सर्वोत्तम होण्याची हिंमत बाळगण्यासारखा मोठ्ठा गुन्हा नाही. -विंन्स्टन चर्चिल.

सत्ता.

सत्तेवर प्रेम असल्याशिवाय ती मिळवता अथवा टिकवता येत नाही. -लिओ टॉलस्टॉय.

विचार.

जॉर्ज बर्नार्ड शॉ

विवेकी माणूस जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. अविवेकी माणूस जग आपल्यानुसार बदलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जगाची प्रगती अविवेकी माणसांवर अवलंबून असते. -जॉर्ज बर्नार्ड शॉ.

विचार.

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले," जगात मी असताना आलीस कशाला ?"

मैत्री म्हणाली," तू जिथे अश्रू ठेवून जाशील, तिथे तिथे हसू फुलवायला." -अज्ञात.

सुविचार २

१. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाअसतो.
२. उद्याच काम आज करा आणि आजचं काम आत्ता करा.
३. रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका, शहाणपणाने काम करा.
४. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
५. श्रीमंती पैशावरून नाही तर किती माणसे जोडली यावरून कळते.
६. एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

सुविचार १

१. स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.
२. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
३. आपण जे पेरतो तेच उगवतं.
४. चुकतो तो माणूस आणि चुक सुधारतो तो देवमाणूस.
५. अंथरूण बघून पाय पसरावेत.
६. सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
७. वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस. !!
८. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
९. चांगले तेवढे घ्या , वाईट फेकून द्या.
१०. पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

नमस्कार

विद्यार्थ्यांना उपयुक्त असे वाक्प्रचार म्हणी देण्याचा हा एक प्रयत्न आहे. वाचकांना काही सुचना असल्यास Comment मधे द्यावीत. लवकरच हे पान आपल्यासाठी येत आहे.